ज्याच्या पराभवाची चर्चा होतेय तो सिकंदर कोण?

मुंबई | पुण्यात 65 वी महाराष्ट्र (Maharashtra) केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. यावेळी शिवराज राक्षे यांनं महेंद्र गायकवाड याला पराभूत करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकवली. मात्र चर्चा झाली ती म्हणजे सगळ्या पैलवानांना चितपट करत सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या सिकंदर शेखची. कोण आहे सिकंदर शेख?

सिकंदर शेख मुळचा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा. घरातूनच कुस्तीचा वारसा शेख कुटुंबियांना मिळाला होता. मात्र सिकंदरच्या वडिलांना घरच्या जबाबदारीमुळे तो वारसा पुढे ढकलता आला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये कुस्तीची बीजे रोवली. सिकंदरचे वडील घर सांभाळण्यासाठी हमाली करायचं. पुढे काहीकारणास्तव त्याचा वडिलांना त्यांचा एक डोळा गमवावा लागला आणि याचमुळे सिकंदरचा भावाने कुस्ती सोडून घराची जबाबदारी घेतली. घरातील ही दारिद्र्याची आणि हालाखीची परिस्थिती लवकरात लवकर कमी व्हावी. यासाठी सिकंदरने मनापासून प्रयत्न आणि कष्ट केले. त्या कष्टाचं फळ त्याला मिळालं भारतीय लष्करात तो भरती झाला. सैन्यदलाकडून खेळत पट्ट्यानं मैदानं मारली. जिद्द आणि निश्चयाने घराची परिस्थिती सुधरवली. देशभरातल्या कुस्त्या लढून सिकंदरने अनेक ट्रक्टर, कार, बुलेट आणि चाळीस गद्या आपल्या नावावर केल्या. घराच्यांना सुखाचे दिवस दाखवले. मान सन्मान मिळवला.

सिंकदर शेखने खुल्या गटातून माती विभागातील फायनलमध्ये प्रवेश केला. मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमीफायनल कुस्ती महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि सिकंदर शेख यांच्यात पार पडली. आणि सिकंदर जिंकून फायनला जाणार आणि यावेळीची महाराष्ट्र केसरीची गदा तोच पटकवणार अशी खात्री असणाऱ्याचा हिरमोड झाला कारण महेंद्रला सिकंदरपेक्षा अधिक गुण मिळाले आणि महेंद्र फायनलमध्ये पोहचला. आणि सिकंदरसोबतच त्याला महाराष्ट्र केसरी होताना पहायचं स्वप्न असणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला. हा होता सिकंदरचा इथपर्यंतचा प्रवास.

घरात अठराविश्व दारिद्र असलेल्या पोराला त्याचा बाप हमाली करुन देखील स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवतो, हमालीच्या पैशावर खुराक खाऊन जगलेला सिंकदर शेख त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो. बक्षिस, पैसा आणि मानसन्मान मिळालेला सिंकदर इथपर्यंत येतो काय, जिंकला नसला तरी लोकांच्या ह्द्यात आदराचा स्थान निर्माण करतो काय आणि पुन्हा नव्या जोमाने लढण्याची तयारीने पुन्हा उभारतो काय सिकंदरचा हा प्रवास खरचं प्रेरणा देणारा आहे..

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More