Saif Ali Khan Attacked | बॉलिवूड विश्वात एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या प्रकरणात पोलिसांनी मोलकरणीचा जबाब नोंदवला आहे, यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सैफवर तब्बल 6 वार :
सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यापैकी दोन जखमा जास्त खोलवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र त्यामधील एक जखम मनक्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर सैफवर तब्बल 6 वार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
याशिवाय धक्कादायक बाब म्हणजे सैफ सोबत त्याच्या मोलकरणीवर देखील चोरटयांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिच्या हाताला मोठ्या प्रमाणात इजा झाली असून तिच्यावर देखील उपचार करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी सैफच्या मोलकरणीचा देखील जबाब नोंदवून घेतला आहे. या जबाबानुसार एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
Saif Ali Khan Attacked | मोलकरणीच्या जबाबातून महत्वाची माहिती समोर :
यासंदर्भात मुंबई पोलिस डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याच्या मोलकरणीसोबत जोराने वाद घालू लागला. मात्र ज्यावेळी अभिनेत्याने त्यामध्ये हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तेव्हा त्या व्यक्तीने सैफ अली खानवर देखील हल्ला करून त्याला जखमी केले.
मात्र या धक्कादायक हल्ल्यात सैफ अली खानवर 6 वार झाले. तसेच त्याच्या मनक्यावर देखील खोलवर जखम झाली आहे. मात्र ही घटना का घडली?, व कोणी घडवून आणली या घटनेचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
News Title : Who exactly is the unknown person who attacked Saif?
महत्वाच्या बातम्या-
मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं
सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
‘स्टेप बाय स्टेप सर्व प्रकरणं…’; वाल्मिक कराडच्या पत्नीचा सुरेश धस, बजरंग सोनवणेंना इशारा
घरात घुसून चाकूने सपासप वार, सैफ अली खानसोबत नेमकं घडलं काय?