बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली?, गृहमंत्री म्हणाले…

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळाचा आरोप केला होता. त्यानंतर सोमवारी 20 सप्टेंबर रोजी कराड मध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयावर नवीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. मात्र, आता किरीट सोमय्या यांना कराड येथे पोलिसांनी रोखून घेतलं आहे.

किरीट सोमय्यांवर केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्याचं दिसत आहे. या कारवाईवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी किरीट सोमय्यांवर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन किरीट सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेत प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोमय्या यांना थांबवण्यात आलं असल्याचं देखील वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अशा घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाते. मात्र याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली का नाही हे मला माहित नसल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नसून जो निर्णय घेण्यात आला तो गृहमंत्र्यालयानं घेतला आहे ही वस्तुस्थिती असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्याच्या घराला कधी छत नव्हतं, त्याला आज काॅंग्रेसने मुख्यमंत्री बनवलंय”

सासू सासऱ्यांना आला सूनेवर संशय, नात्वाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन्…

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

ऐकावं ते नवलंच! रामदर्शनाला जाताना दोन्ही मुलींना गमावलं दोन वर्षांनी त्याच तारखेला….

“कोणालाही द्यायला आमचं ऑफर लेटर असंच मैदानात पडलेलं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More