Chhava | बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवणारा आणि ऐतिहासिक वारसा जिवंत करणारा ‘छावा’ (Chhava) हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने 300 कोटींच्या घरात कमाई केली आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी संभाजी महाराजांची भूमिका ताकदीने साकारली असून, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांनी महाराणी येसूबाईंची भूमिका केली आहे. मात्र, या चित्रपटात आणखी एका गोष्टीने प्रेक्षकांना भारावून टाकलं आहे.
चित्रपटात छत्रपती शिवरायांचे संवाद नेमके कोणी दिले?
‘छावा’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रत्यक्ष दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व संपूर्ण सिनेमात जाणवत राहते. विशेषतः संभाजी महाराज आणि शिवरायांमधील संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये बाल शंभूराजे त्यांच्या आईसाहेब आणि आबासाहेबांना हाक मारताना दिसतात. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करणारा आणि उत्तर देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज ऐकू येतो.
हा संवाद आणि आवाज इतका प्रभावी आहे की, तो प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचतो. या आवाजाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. छत्रपती शिवरायांचा आवाज नेमका कोणी दिला आहे, याबाबत अनेक चर्चाही रंगल्या. अखेर या रहस्यावर पडदा उघडला असून, सत्य समोर आलं आहे.
शिवरायांचा आवाज दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिला!
चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज कोणी दिला, याचा उलगडा झाला आहे. हा आवाज कोणी प्रसिद्ध अभिनेता किंवा डबिंग आर्टिस्टने दिला नसून, तो स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी दिला आहे. विजय विक्रम (Vijay Vikram) नावाच्या डबिंग आर्टिस्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. (Chhava)
चित्रपट पाहताना हा आवाज लक्ष्मण उतेकर यांनी दिला आहे, हे कुणालाही सहज लक्षात येत नाही. त्यामुळे ते केवळ एक उत्कृष्ट दिग्दर्शकच नाहीत, तर प्रभावी व्हॉइस आर्टिस्ट देखील आहेत. त्यांच्या दमदार आवाजामुळे शिवरायांचा प्रभाव चित्रपटात जाणवत राहतो.
‘छावा’च्या कमाईने नवा विक्रम!
165 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘छावा’ या चित्रपटाने संपूर्ण देशभरात तुफान कमाई केली आहे. हा चित्रपट 300 कोटींच्या घरात पोहोचला असून, जागतिक स्तरावर 400 कोटींच्या पुढे गेला आहे. या चित्रपटाने ऐतिहासिक चित्रपट कसा असावा, याचा उत्तम नमुना सादर केला आहे. (Chhava)
Title : Who Gave Voice to Chhatrapati Shivaji Maharaj in Chhava