बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही करु नका; WHOनं दिला महत्त्वाचा इशारा

नवी दिल्ली | मागील वर्षभरापासून कोरोनाने जगभर कहर केला आहे. विविध देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्यानं पु्न्हा लाॅकडाऊन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. तर भारतात देखील कोरोनाचं संकंट वाढत चाललं आहे. भारतासह इतर देशात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. याच संदर्भात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने लस घेतल्यानंतर होणाऱ्या चुकींंबद्दल महत्वाचा सुचना दिल्या आहेत.

कोरोना लस घेतल्यानंतर थोडं साईड इफेक्ट होणं ही सामान्य गोष्ट आहे, असं डब्लुएचओनं सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर डोकंं दुखणे , ताप येणे, अंग दुखणे ही सामान्य बाब आहे. कोरोनो प्रतिबंधक लसीला शरीर साथ देत असल्याचं हे लक्षण आहे. लस घेतल्यानंतर शरीर पुर्वरत होण्यासाठी काही काळ लागतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असं देखील डब्लुएचओनं म्हटलं आहे.

डब्लुएचओने काही गोष्टी करू नये यासंदर्भात देखील काही सुचना दिल्या आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर शरीरावर काही दिवस टॅटू काढू नये. त्यामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. तर कोरोना लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची लस घेऊ नये असा सल्ला देखील देण्यात आला आहे. जर दुसऱ्या प्रकारची लस घेण्याची गरजच असेल तर काही आठवड्याचा कालावधी असणे आवश्यक आहे, असं डब्लुएचओने सांगितलं आहे.

लस घेतल्यानंतर काही दिवस अंगदुखीच्या समस्या येऊ शकते. त्यामुळे व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला गेला आहे. पाणी हे शरीरातीत प्रतिकारशक्ती वाढवण्यास आवश्यक असल्यानं शरीरात पाणी कमी पडू देऊ नका. तर कोरोना लसीकरणानंतर सर्टिफिकीट जपून ठेवण्याचा सल्ला देखील डब्लुएचओनं  दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

नाव न घेता उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना झापलं!

‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; जाणुन घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More