Top News

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील ‘या’ तीन औषधांवर आणली बंदी

नवी दिल्ली | जागतिक आरोग्य संघटनाने भारताला जोरदार धक्का दिला आहे. कोरोना रुग्णांना मलेरियावरील औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, एड्सवरील लोपिनवीर आणि रिटोनवीरचे कॉम्बिनेशनचे डोस देण्यावर पुन्हा बंदी आणली आहे. या औषधांच्या वापराने मृत्यूदरामध्ये कोणतीही घट झालेली नाही, असं डब्ल्यूएचओने म्हटलंय.

य़ा दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरामध्ये कोणतीच घट झालेली नाही. उलट मृत्यूदर वाढत चालला आहे, असं डब्ल्यूएचओने सांगितलं आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा वेगानं फैलाव होत आहे. कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे या औषधासाठी अमेरिकेसह अनेक देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता.

भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी सर्व प्रमुखांनी केली होती. यानंतर भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात सुरू केली. या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनीदेखील मोदींची स्तुती केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील

महत्वाच्या बातम्या-

एकतर्फी प्रेमातून नववधूची लग्नाच्याच दिवशी हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

106 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात, ठणठणीत होऊन परतले घरी

संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची काळजी करावी- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या