Top News देश

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

नवी दिल्ली | उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्ये किम यो जाँग यांचं नाव आघाडीवर आहे.

किम यो जाँग या किम जाँग उन यांची बहिण आहे. २६ सप्टेंबर १९८७ रोजी त्यांचा जन्म झाला असून त्या किम जाँग उन यांच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान आहेत. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी स्वित्झर्लंडच्या बर्न शहरातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

साधारणतः २०१४ सालापासून त्या राजकारणात सक्रीय झाल्या. किम जाँग उन यांच्या प्रचारप्रमुख म्हणून त्या काम पाहतात तसेच किम यांची प्रतिमा चांगली रहावी याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

काही महिन्यांपूर्वी किम यांनी त्यांच्याकडे महत्त्वाची राजकीय जबाबदारी सोपवली आहे. त्यांना पॉलिट ब्यूरोचं सदस्य बनवण्यात आलं आहे, याच पॉलिट ब्यूरोच्या मदतीनं किम जाँग उन अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात, त्यामुळे किम यो जाँग यांच्याकडेच उत्तर कोरियाच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय.

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान करणार ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

अबब!!! कोरोनासंदर्भात राज्यात तब्बल एवढ्या जणांवर गुन्हे दाखल

राज्यात दिवसभरात तब्बल 811 कोरोनाचे नवे रुग्ण; एकूण आकडा 7,628 वर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या