बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना – नारायण राणे

कोल्हापूर | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणेंवर (Nitesh Rane) आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. अशातच आता या सगळ्या प्रकारावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) पत्रकार परिषद घेत वक्तव्य केलं आहे.

नितेश राणेंवर सगळीकडून हल्लाबोल होत असतानाच आता नारायण राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना, अशा खोचक शब्दांत राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

कोण अजित पवार?, मी ओळखत नाही त्या अजित पवारांना. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांचा काय रेफरन्स देता, असा म्हणत राणेंनी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात याचीच चर्चा होत असलेली पहायला मिळत आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी नितेश राणेंवरही वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे. पण मी का सांगू? त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. राज्याचा डिजी, राज्यातले पोलीस कशाला आले आहेत. मारहाण किरकोळ झाली आहे मग कशाला आले आहेत?”, असंही राणेंनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

“नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे, पण मी का सांगू?”

“कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा”

स्थापना दिनीच काँग्रेसचा झेंडा पडला खाली, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

‘पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’; रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

Corona: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More