बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणात दावा करणाऱ्या मनिष भंगाळेंचा एकनाथ खडसेंच्या ‘या’ प्रकरणातही होता थेट संबंध

मुंबई | सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या आर्यन खान प्रकरणाला रोज वेगळं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक आणि पंच प्रभाकर साईलच्या आरोपानंतर आता हॅकर मनिष भंगाळेंनीही आर्यन खान प्रकरणात उडी घेतली आहे. पण आर्यन खान प्रकरणात पुरावे टॅम्पर करण्यासाठी लाखोंची ऑफर मिळाल्याचा दावा करणारे मनिष भंगाळे आहेत तरी कोण?, आर्यन खान प्रकरणात नाव समोर येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या एका प्रकरणातही त्यांचा थेट संबंध होता.

मुळचे जळगावचे रहिवासी असलेले मनिष भंगाळे यांनी जळगावातच 12वी पर्यंतच शिक्षण जळगावातच पूर्ण केलं. विज्ञान शाखेतून 12वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातून पुढचं शिक्षण पूर्ण केलं. मनिष भंगाळेंनी 1994 पासून तांत्रिक क्षेत्रात झालेल्या सर्व बदलांमध्ये प्रभुत्व मिळवल्याचा दावा केला आहे. हॅकर असलेले मनिष भंगाळे यांनी साधारण पाच वर्षापूर्वी एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातही एक गौप्यस्फोट केला होता.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जे तेव्हा भाजपमध्ये होते, यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा दावा केला होता. एकनाथ खडसेंना डॉन दाऊद इब्राहिमच्या कराची येथील घरून फोन आला होता, असा दावा मनिष भंगाळेंनी केला होता. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर भंगाळेंनी केलेला दावा बनावट असल्याचं समोर आलं. यानंतर मनिष भंगाळेंना अटक देखील करण्यात आली होती.

यानंतर आता मनिष भंगाळेंनी आर्यन खान प्रकरणात एक दावा केला आहे. आर्यन खान प्रकरणातील पुरावे टॅम्पर करण्यासाठी मला 5 लाख रूपयांची ऑफर देण्यात होती. मला 3 नंबरचे CDR, व्हॉट्सअॅप चॅटच्या बॅकअपमध्ये बदल करून प्रभाकर साईलच्या नावाने डुप्लिकेट सिम कार्ड घ्यायला सांगितलं आणि त्यासाठी 10 हजार अॅडव्हान्स दिले असल्याचा खुलासाही मनिष भंगाळेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खान प्रकरणात हॅकर मनिष भंगाळेचा खळबळजनक दावा; ‘ते’ CDR काढण्यासाठी होती लाखोंची ऑफर

मोठी बातमी! पुणे पोलिसांनी अखेर किरण गोसावीच्या मुसक्या आवळल्या

आर्यन खानचं भविष्य आज ठरणार; जामीनावर होणार सुनावणी

महामार्गावरील ढाब्यावरच पेट्रोल पंप, काय आहे नितीन गडकरींचा हा नवा प्लॅन?

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता मुंबई पोलिसांचीही उडी! करणार ‘हा’ तपास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More