नवी दिल्ली | मिया खलिफाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र ही मिया खलिफा नेमकी आहे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकांना तिचं नाव माहित आहे, तर बहुतेक जणांना तिच्या कामाबद्दलही माहित आहे, मात्र यापेक्षा अधिक माहिती फार कमी लोकांना ठावुक आहे.

मियाँ खलिफा ही पोर्नस्टार होती. तिने आता पोर्न इंस्टस्ट्रीमध्ये काम करणं सोडलं आहे. मात्र अजून पोर्न साईट्सवर तीच्या व्हिडीओंचा धुमाकूळ सुरु आहे. सध्याच्या सर्वात ट्रेंडिंग पोर्नस्टार्समध्ये देखील मिया खलिफाचा समावेश होतो.

मिया खलिफा मूळची लेबनानची आहे. २००१ साली मिया खलिफाचं कुटुंब अमरिकेला स्थायिक झालं. त्याआधी १० फेब्रुवारी १९९३ रोजी मियाचा जन्म झाला. तिचं बहुतांश शिक्षण अमेरिकेतच झालं. पोर्न इंटस्ट्रीत येण्याआधी तिनं इतरही ठिकाणी बरंच काम केलं होतं.

मियाची पॉर्न इंटस्ट्रीत एन्ट्री कशी झाली?
मिया आणि तिच्या आधीच्या पतीनं २०१४ सालच्या सुरुवातीला काही पोर्नोग्राफिक फोटो इंटरनेटवर टाकले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये तीनं अधिकृतपणे पॉर्न इंटस्ट्रीत प्रवेश केला. मात्र तिचा हा प्रवेश चांगलाच वादात सापडला. त्याला कारण होतं तीनं शूट केलेला वादग्रस्त व्हिडीओ

मिया खलिफाने तयार केलेल्या अश्लील व्हिडीओमध्ये तीने हिजाब घातला होता, अर्थात मुस्लीम वेश परिधान करुन असा व्हिडीओ केल्यानं जगभरातील इस्लामी राष्ट्रांमधून मियाँविरोधात रोष व्यक्त होऊ लागला. हा वाद इतका वाढला की मियाला अतिरेकी संघटनांच्या धमक्या यायला लागल्या.

पॉर्न इंटस्ट्रीत प्रवेश केल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात मिया सगळ्यात शोधली जाणारी पॉर्नस्टार बनली. डिसेंबर २०१४ मध्ये पॉर्नस्टार वेबसाईट पॉर्नहबनं जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार मिया नंबर वन पॉर्न कलाकार बनली होती. सगळ्या जगात फक्त तीचे व्हिडीओ पाहिले जात होते.

मिया खलिफा सांगते, की मी फक्त तीनच महिने या इंटस्ट्रीमध्ये काम केलं. नुकतंच एका मुलाखतीत तीनं या इंडस्ट्रीतून कमवलेल्या पैशांबद्दलही धक्कादायक खुलासा केला. तीने सांगितलं की लोकांना वाटतं मी अशा पद्धतीचे व्हिडीओ तयार करुन खूप पैसा कमावला, पण असं अजिबात नाहीये. कारण या इंडस्ट्रीतून मी फक्त साडेआठ लाख रुपये कमावले आहेत, असं मियानं सांगितलं.

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे मियाला आता दुःख होत आहे. ती सांगते की, मला आता सार्वजनिक ठिकाणी जाता येत नाही. कुठं गेले की लोक माझ्याकडे असे पाहत असतात की जणू काय ते माझ्या कपड्यांच्या आरपार पाहात आहेत. यामुळे मला संकोचल्यासारखं होतं. असं वाटतं की मी माझ्या खासगी आयुष्याचे सर्व अधिकार संपवले आहेत.

मिया म्हणते, मी लोकांपासून फक्त गुगल सर्च इतकीच दूर आहे. कुणीही मला सर्च केलं की तसले व्हिडीओ पाहतात. व्हिडीओत पुरुष जे पाहतात, स्त्रियांकडून त्यांना तेच हवं असतं. मात्र असं मुळीच नसतं. ते अजिबात खरं नसतं. कोणीही सारं काही परफेक्ट होईल, यासाठी अशा गोष्टी करत नाही, त्यामुळे अशा अपेक्षा करणं चुकीचं असल्याचं तीचं म्हणणं आहे.

मिया सांगते की, ‘लहानपणी मी फारच जाड होते. मी कधीच आकर्षक नव्हते. जाड असल्याने मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र कॉलेजच्या पहिल्या वर्षात अचानक माझं वजन कमी झालं आणि मी चांगली दिसायला लागले. त्यानंतर ग्रॅज्युएशन करताना मी स्वतःचं वजन आणखी कमी करुन स्वतःला आकर्षक बनवलं. मुलाचं माझ्याकडे लक्ष जायला लागला. सारेच माझ्या सौंदर्याचं आणि शरीराचं कौतुक करायचे. इथेच अनेकांनी मला न्यूड मॉडेलिंगचे सल्लेही दिले”

वादग्रस्त व्हिडीओबद्दल मिया काय म्हणते?-
पॉर्नोग्राफीक व्हिडीओ तयार करताना मियाने हिजाब घातला होता त्यामुळे इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि तिला या साऱ्या प्रकरणात अनेक जीवघेण्या धमक्याही आल्या. या साऱ्या प्रकारात मियाला खूप सारी प्रसिद्धीही मिळाली, ती जगभरात प्रसिद्ध झाली. मात्र ती म्हणते की मला असली प्रसिद्धी नको होती. धमक्यांसारखे प्रकार घडल्यानं तीनं पॉर्न इंडस्ट्रीला देखील रामराम ठोकला.

मिया खलिफा सध्या काय करते?-
मिया खलिफा सांगते की पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर तीला प्रचंड ताण सहन करावा लागला. तिला कोणीही नोकरी द्यायला तयार होत नव्हतं. अखेर तीनं स्वतःच यावर मार्ग शोधला. ती सध्या एक यूट्यूब चॅनेल चालवत आहे. मॉडेल म्हणून काम करत आहे. तसेच क्रीडा अँकर म्हणूनही ती काम करत आहे.


महत्त्वाच्या बातम्या-
मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे
करुणा धनंजय मुंडेंचा तक्रार अर्ज आला समोर; केलेत ‘हे’ 6 धक्कादायक आरोप
धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?- तृप्ती देसाई
एकीकडे आईचे आरोप तर दुसरीकडे… धनंजय मुंडेंच्या मुलीचा तो व्हिडीओ व्हायरल
‘पोलिसांनी मला सहकार्य न केल्यास…’; करूणा शर्मा यांनी दिला ‘हा’ इशारा