बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष?; ‘या’ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

मुंबई | राज्यात नवीन सरकार आल्यापासून शिवसेना आणि भाजप पक्षातील हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अद्याप खातेवाटप झालं नाही. तरी सुद्धा दोन्ही पक्षातील बरेच नेते आणि आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यात आता कोणाची वर्णी लागते हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजपचे आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे त्यांची जागा येणाऱ्या काळात रिकामी होणार आहे. तेव्हा त्या जागेसाठी उमेदवार निश्चित करावा लागणार आहे. सत्ताबदल झाल्यानंतर भाजपचे पुढील लक्ष मुंबई महानगरपालिका जिंकणं असून हे पद मुंबईच्या नेत्याला जाण्याची शक्यता आहे. आशिष शेलार हे मुंबईचे आक्रमक नेते आहेत.

तसेच भाजप प्रदेशप्रमुख पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे यांचे नाव पुढे येत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांची विधान परिषदेवर निवड झाली आहे. विदर्भातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील नाव भाजप प्रदेशाध्यक्षासाठी चर्चेत आले आहे. पक्षाने मला भरभरुन दिलं. यापुढेही माझ्यावर जी जबाबदारी पक्ष देईल ती मी स्विकारेन, अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिलीये.

दरम्यान, खाते वाटपावरुन नव्या सरकारमध्ये मोठी चर्चा होत आहे. महसूल मंत्री पदावरुन भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. चंद्रकांत पाटलांना महसूल खातं हवं आहे. पण महसूल खातं कोणाला द्यावं यावरुन मोठा पेच सुरु असल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या –

‘देवेंद्र मध्यरात्री वेश बदलून…’; अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

लहान मुलांसाठी LIC ची भन्नाट योजना; दररोज 150 रूपये गुंतवणूक केल्यास मिळतील ‘इतके’ लाख

शीर धडावर हवंय ना?, अयोध्येतील साधूची लीना मणीमेकलाईना धमकी

“शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल”

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More