Top News महाराष्ट्र मुंबई

कोण आहे ती बाई? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?- राज ठाकरे

मुंबई | पॉप सिंगर रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ट्विट करत पाठिंबा दर्शवला. त्यानंतर देशातील कलाकारांनी रिहानाच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं. यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

ट्विट करायच्या आधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

मला असं वाटतंय हे फार चिघळलं आहे. आम्ही सगळं पाहत आहोत. सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“आधी वीजबिल माफ करू म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी जाऊन आल्यावर नााही म्हणाले”

‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ

इथं कुणीच मास्क घातलेलं दिसत नाही, बाबांनो… अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

शेतकरी आंदोलनावर मौन बाळगणाऱ्या बॉलिवूडकरांना नसीरूद्दीन शाहांनी झापलं, म्हणाले…

सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या