बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोण आहेत संजय राऊत? काल परवा शिवसेनेत येऊन कोणाला शिकवत आहेत”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याबद्दल बोलताना काही अनिर्वाच्य शब्द वापरले होते. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.

आपण जे काही केलं त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल, अशी राऊतांची स्थिती झाल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. ते सातत्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारे शिवराळ शब्द वापरत आहेत. यामुळे शिवसेनेची प्रतिमा बिघडत असून एका अर्थाने शिवसेना संपवण्याचं कॉन्ट्रक्ट घेतल्याप्रमाणे संजय राऊत वागत आहेत. त्यामुळे मी उद्धवजींना गेले दोन दिवस विनंती करतोय की, संजय राऊतांना आवरा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आम्ही संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही. त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करू शकत नाही. कोण आहेत संजय राऊत?  काल परवा शिवसेनेत येऊन कोणाला शिकवत आहेत. आम्ही अनेक वर्षे उद्धवजींसोबत काम केलं आहे. त्यामुळे मैेत्रीच्या नात्याने आम्ही उद्धवजींना सावध केलं आहे.

दरम्यान, गेल्या निवडणुकीला गोव्यातील सर्व उमेदवारांची मते मिळून शिवसेनेला 743 मते मिळाली. उत्तरप्रदेशमध्येही यांचं डिपॉझिट जप्त होतायेत. तरीही यावेळेस आमच्या शिवाय गोव्यात सरकार स्थापन होणार नाही, असा दावा संजय राऊत करत आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. एकंदरीत संजय राऊत यांच्या जहरी टीकेवरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुरणपोळ्यांवरून राजकारण! रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला, म्हणाले…

महाराष्ट्राला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?, राजेश टोपे म्हणाले…

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

मोठी बातमी! चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना न्यायालयाचा दणका, ‘इतक्या’ वर्षांची सुनावली शिक्षा

“राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More