बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणाचा नव्याने तपास करणारे संजय सिंह कोण आहेत?, जाणून घ्या

मुंबई | एनसीबीने कॉर्डेलिया क्रुझवर केलेली कारवाई आणि ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला केलेली अटक यानंतर एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे विरूद्ध अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हा वाद रंगत आहे. मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत या प्रकरणात वेगवेगळे गौप्यस्फोट केले.

दरम्यान, समीर वानखेडेंनी सगळे आरोप फेटाळून लावले. पण समीर वानखेडे तपास करत असलेल्या आर्यन खान प्रकरणासह एकुण सहा प्रकरणांचा तपास एनसीबीने आता एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आर्यन खान प्रकरण, समीर खान प्रकरणासह इतर 4 प्रकरणांचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या विशेष पथकाचं नेतृत्व आता संजय सिंह करणार आहेत.

संजय सिंह यांनी यापूर्वीही अनेक हायप्रोफाईल केस हाताळल्या असल्याने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्याचं म्हटलं जात आहे. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत संजय सिंह यांनी अनेक महत्वाची पदं सांभाळली आहेत. आयपीएस अधिकारी म्हणून सेवेत रुजू झालेले सिंह यांनी नंतर ओडिसा पोलिस दलाचे अतिरिक्त अयुक्त व नंतर तिथेच महानिरिक्षक म्हणून पदभार सांभाळला.

त्यानंतर सीबीआयमध्ये महानिरिक्षक म्हणून अनेक प्रकरणं हाताळल्यानंतर आता ते एनसीबीत उपमहासंचालक म्हणुन कार्यरत आहेत. संजय सिंह यांच्या कामाचा आलेख आणि अनुभव बघता मुंबईतील ही सहा हायप्रोफाईल प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडे नाही तर ‘हे’ अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

‘मला हटवलं नाही तर मी…’, समीर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण

शाब्बास पुणेकर! पुण्यात आज एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही

समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर नवाब मलिकांचं पहिलं ट्विट, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More