बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार देण्याची हिम्मत दाखवणाऱ्या स्वरदा बापट कोण?, जाणून घ्या

पुणे | पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली मात्र अद्याप गुन्हा दाखल न केल्यानं या प्रकरणी पोलिसांवर मोठी टीका होत होती. कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे न आल्यानं या प्रकरणात गुन्हा दाखल केला नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं होतं. यावरुन भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना लक्ष्य केलं होतं. हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी त्यांची मागणी होती.

दरम्यान, या प्रकरणात आज मोठी घडामोड घडली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात पहिली तक्रार करण्यात आली आहे. स्वरदा बापट यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पुणे पोलिसांवर या तक्रारीमुळे चांगलाच दबाव वाढला आहे. कुणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसताना स्वरदा यांनी स्वतः धाडस दाखवल्यानं पुण्याच्या राजकारणात त्यांची एकच चर्चा सुरु झाली आहे.

Photo Courtesy- Facebook/Sanjay Rathod & Swarada Kelkar-Bapat

कोण आहेत स्वरदा बापट?-

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट यांची स्वरदा सून आहे. गिरीष बापट यांचे चिरंजीव गौरव यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं आहे. स्वरदा बापट सध्या भाजपकडून राजकारणात सक्रीय आहेत. सासरी राजकीय पार्श्वभूमी आहेच, मात्र स्वरदा यांचं माहेरही राजकीय पार्श्वभूमी असलेलं आहे. भाजप ज्येष्ठ पदाधिकारी नीता केळकर यांच्या त्या कन्या आहेत. स्वरदा यांचे वडील श्रीरंग केळकर सांगलीत व्यावसायिक आहेत.

स्वरदा यांनी एलएलबीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. पुण्याच्या डीईएस लॉ कॉलेजध्ये त्या शिक्षणासाठी होत्या. याच कॉलेजमध्ये गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरवही शिक्षण घेत होते, इथेच दोघांनी ओळख झाली होती, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही कुटुंबं राजकीय पार्श्वभूमी असलेली आहेत, शिवाय एकाच पक्षाशी बांधिलकी असलेली आहेत. त्यामुळे घरच्यांनीही त्यांच्या या विवाहाला पाठिंबा दिला होता.

Photo- Facebook/Swarada Kelkar-Bapat

स्वरदा यांच्या आई नीता केळकर राज्य भाजपच्या उपाध्यक्ष होत्या, त्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे वारसाहक्काप्रमाणे हा आक्रमकपणा स्वरदा यांच्या अंगातही उतरलेला आहे. तरुण वयातच त्यांनी रस्त्यांवरच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. भाजपमधील अनेक मोठे नेते घरी ये-जा करत होते, त्यामुळे त्यांची पाठीवर कौतुकाची थाप पाठीवर पडत होती आणि तीच थाप त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरत होती.

स्वरदा यांचं कायद्याचं शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे कायद्यातील खाचाखोचा त्यांना माहीत आहेत. त्यांनी अनेक परदेशी सेमिनार्समध्ये भाजप तसेच देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बाल हक्क आयोगाच्या मार्फत त्या करत असलेलं कामही आश्वासक आहे.

बापट कुटुंब, Photo- Facebook/Swarada Kelkar-Bapat

स्वरदा केळकर यांना लहानपणापासून त्यांच्या आईचं मार्गदर्शन लाभलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कायमच स्वरदा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असतात. पंकजा मुंडे यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही स्वरदा यांची चांगली ओळख आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद, त्यात पुण्यासारख्या शहरातील खासदाराची सून त्यामुळे भविष्यात भाजपचा आक्रमक महिला चेहरा म्हणून त्या समोर येऊ शकतात.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांना हवं ते मिळालं, आता कारवाई होणार?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली कार, पाहा व्हिडीओ!

संजय राठोड यांना मोठा धक्का; खासदार गिरीश बापट यांच्या सूनेकडून पोलिसात तक्रार दाखल

मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना, कोरोना- देवेंद्र फडणवीस

“आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताईंसारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More