राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे ‘तारिक अन्वर’ नेमके कोण आहेत?

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव आणि खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रावादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यासोबतच त्यांनी लोकसभेच्या खासदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. राफेल डिल प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधानांंची पाठराखण केल्याने त्यावर नाराज होऊन तारिक अन्वर यांनी हा निर्णय घेतला आहे. 

कोण आहेत तारिक अन्वर?- 

  • तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असून बिहारमधील कटीहार येथुन लोकसभेत खासदार होते. याव्यतिरिक्त त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवांचे पदही भूषवीले आहे.
  • तारिक अन्वर यांची राजकिय कारकिर्द फारच कमी वयात सुरू झाली. ते 1976 ते 1981 दरम्यान बिहार युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी भारतीय युवा काँग्रेस, बिहार प्रदेश काँग्रेस कमीटीचे अध्यक्षही होते. 
  • 1999 मध्ये त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांसोबत तारिक अन्वर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत मिळून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली.
  • 2004मध्ये शरद पवारांनी त्यांना महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्यत्वही दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणारे तारिक अन्वर कोणत्या पक्षात जाणार?

-तारिक अन्वर यांनी ‘राष्ट्रवादी’ला का सोडचिठ्ठी दिली?

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; तारिक अन्वर यांनी पक्ष सोडला

-फेसबुक स्टोरीज (स्टेटस) बाबत फेसबुकनं जाहीर केला महत्त्वाचा निर्णय

-‘रावण-राजा राक्षसांचा’ वाचकांच्या भेटीला, नागराज मंजुळेंच्या हस्ते प्रकाशन

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या