बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या रात्री तावडे नावाच्या माणसाचा फोन आला अन्…’; मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात असतानाच स्फोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी पत्रकार परिषद घेत एक धक्कादाखक खुलासा केला आहे.

मनसुक यांना गुरूवारी रात्री कांदिवलीवरून एका तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर ते पोलिस चौकशीसाठी बाहेर गेले आणि परत आलेच नाही. रात्री दहानंतर त्यांचा फोन बंद होता. आम्ही रात्रभर वाट पाहिली परंतू ते सकाळपर्यंत आले नाही. त्यानंतर आम्ही सकाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, अशी माहिती विमल हिरेन यांनी माध्यमांना दिली.

ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचं आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी दिली आहे.

कांदवली क्राईम ब्रांचमध्ये तावडे आडनावाचे कोणीही अधिकारी कार्यरत नाही. मात्र दहिसर क्राईम ब्रांचला युनिट 12 महेश तावडे नावाचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. पण क्राईम ब्रांचचे अधिकारी महेश तावडे 1 मार्चपासून सुट्टीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात टीव्ही 9 मराठीने वृत्त दिलंय.

थोडक्यात बातम्या-

‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी

“वझे बिझे वाजत गेेले, आम्हाला त्यांची भिती दाखवू नका”

मनसुख यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

महाविकास आघाडीतील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

‘या’ जिल्ह्यातील चार टोळींमधील 18 गुंडांना केलं तडीपार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More