बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशात सक्षम पर्याय कोण? हा प्रश्न अनेकवेळा उपस्थित करण्यात येतो. पुण्यातील आयोजित कार्यक्रमात बोलताना काँग्रेस (Congress) नेते कन्हैय्या कुमार (Kanhaiyya Kumar) यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. यावेळी भाषणात कन्हैय्या कुमारांनी देशातील अनेक मुद्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोणत्याही आजाराला पर्याय विचारला जात नाही तर त्यावर इलाज केला जातो. कोरोनावर देखील इलाज म्हणून लस शोधण्यात आल्याचं उदाहरण कन्हैय्या कुमार यांनी दिलं. (Kanhaiyya Kumar criticizes the central government)

स्वातंत्र्यानंतरच्या काळात बीएसएनएल (BSNL) पासून रेल्वे (Railway), एअर इंडिया(Air India) यांसारख्या सार्वजानिक कंपन्या विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसकडून सार्वजानिक क्षेत्रातील कंपन्या वाढवण्याचा आणि टीकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, केंद्र सरकारने धोका करत कंपन्या विकण्याचं काम केल आहे, अशी टीका कन्हैय्या कुमार यांनी केली.

‘काँग्रेस ही एक संस्कृती आहे. समानता हा पक्षाचा आत्मा आहे. संविधान टिकले तर देश टिकेल, ही काँग्रेसची भूमिका आहे. याकारणामुळे देशाचा मुळ गाभा असलेल्या समानतेच्या तत्वाला सुरूंग लावण्याचं काम  भाजपने केलं आहे. भाजपच्या विरोधात समर्थपणे उभं राहण्याची गरज आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून हे कार्य समर्थपणे पार पाडू’, असं कन्हैय्या कुमार म्हणाले आहेत.

दरम्यान, महागाईने जनता त्रासली आहे. त्यावर देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. गेल्या सात वर्षातील घोषणा आठवल्या तर या सरकारने लोकांची किती फसवणूक केली हे लक्षात येईल. केंद्र सरकार केवळ फसवणूक करणारे सरकार असून सामान्याकरिता या सरकारला कसलीही कणव नसल्याची टीका कन्हैय्या कुमार यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

Omicronचा धोका वाढतोय! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दो दिलों का मिलन! कैफ-विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई विमानतळावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ कोटींचं ड्रग्ज जप्त

Second Dose घेतलाय का?; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राहुल गांधींचा दौरा! अजित पवार म्हणतात,”…मग आम्हाला विचार करावा लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More