बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2021चा चॅम्पियन कोण? फायनलमध्ये ‘या’ 8 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

मुंबई | आज आयपीएल 2021चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाने आक्रमक खेळी करत अंतिम सामन्यात मजल मारली आहे त्यामुळे आजचा सामना रोमांचक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या सामन्यात दोन्ही संघातील 8 प्रमुख खेळाडूंवर नजर असणार आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात कोलकाताने व्यंकटेश अय्यरला संघात स्थान दिलं. त्यानंतर कोलकाताच नशीबच बदललं. सलामीवीर व्यंकटेश अययर आणि शुभमन गील या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. तर लाॅकी फर्ग्युसन आणि सुनील नरेन या दोघांनी कोलकाताला मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिल्या आहेत. परंतु, कोलकाताला आज आपल्या मिडल ऑर्डरवर काम करावं लागेल.

तर दुसरीकडे 3 वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत चेन्नईने फायनल गाठली आहे. यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा मोलाचा वाटा आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे चेन्नईला फायनलच तिकीट मिळालं. तर रॉबिन उत्तापाने देखील मागच्या सामन्यात धुवाधार फटकेबाजी केल्यानं त्याला आजच्या सामन्यात देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजीत लार्ड शार्दूल ठाकूर आणि दीपक चहरच्या जोरावर चेन्नई कोलकाताला रोखू शकेल.

दरम्यान, जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. दुबईतील 12 पैकी 9 सामने या हंगामात पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. शिवाय, दुबईमध्ये कोलकाताच्या 6 विजयांपैकी सर्व धावांचा पाठलाग करताना आले आहेत. तर दुसरीकडे धावांचा पाठलाग करताना तर या हंगामात चेन्नईने पाच सामने गमावले आहेत. त्यामुळे आता सर्वांचं या सामन्याकडे लक्ष लागून राहीलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

मोठी बातमी! सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More