बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, सोनू सूद म्हणाला…

मुंबई | लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी देवदूत ठरलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लोकांच्या मनात आपलं एक वेगळं असं स्थान निर्माण केलं होतं. याच पार्श्वभमूीवर सोनू सूदला ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड’ ने सन्मामित करण्यात आलं. यावेळी सोनूची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्याला महाराष्ट्रातील आवडता नेता कोणता?, असा सवाल करण्यात आला. यावर सोनूने यावर लक्ष वेधूून घेणारं उत्तर दिलं.

महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, यावर या प्रश्नामुळे आपण संकटात पडल्याचं सोनूने मिश्किलपणे म्हटलं. मात्र त्यानंतर सोनूने थोडा वेळ घेतला आणि विचार केला अन्  महाविकास आघाडीचे सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव घेतलं.

सोनूला त्याला महाराष्ट्रातील आवडणाऱ्या पदार्थाची नाव विचारली. यावर त्याने वडापाव, पोहे आणि पुरणपोळीचं नाव घेतलं. त्यानंतर त्याला आठवण झाली ती नागपूरच्या मिसळपावची. त्यानंतर त्याने नागपूरची आठवण सांगितली. नागपूरच्या शंकरनगर येथील मिसळ पाव मी कधीच विसरू शकत नाही. मी कॉलेजला असताना शंकरनगरच्या त्या छोट्याशा मिसळ स्टॉलवर अजुनही आवर्जुन जायचो आणि ते मिसळ स्टॉल आजही आहे, मला वेळ मिळाला तर मी नक्की नागपूरला जाणार असल्याचं सोनू म्हणाला.

दरम्यान, सोनू सूदने मुलाखतीवेळी सामाजिक बांधिलकी, महाराष्ट्राशी जुळलेलं नात, मुंबईतील स्ट्रगल आणि नागपूरशी असलेलं नातं या सर्व गोष्टींवर मनमोकळेपणाने संवाद साधला.

थोडक्यात बातम्या- 

‘राज्यात भाजपचं सरकार आल्यावर….’; नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला शब्द

भारीच की! बीएम डब्लूची इलेक्ट्राॅनिक कार लवकरच लाँच, एकदाच करा चार्ज अन्….

राखी सावंतचा फॅन्स सोबतचा क्वालेटी टाईम पाहून तुमचं देखील होईल मनोरंजन, पाहा व्हिडीओ

सावधान! जर तुम्हीही शेअर करत असाल फेसबुक ग्रुपवर ही माहिती

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील टोलवसुलीवरून न्यायालयाचा ‘एमएसआरडीसी’ ला दणका; कॅगला दिले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More