बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कोणाला? वाचा निवडणुकीपूर्वी लोकांचं मत काय

नवी दिल्ली | पुढच्या वर्षी देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागलं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुका येत्या वर्षाच्या सुरूवातीला लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता सी-वोटरने एबीपी नेटवर्कसाठी घेतलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक अंदाज समोर येत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार तब्बल 40 टक्के लोकांनी सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहिली पसंती दिली आहे. तर अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी 27 टक्के लोकांनी होकार दिला आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्ये 30 टक्के लोकांना माजी मुख्यमंत्री हरिश रावत मुख्यमंत्रीपदी हवे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत हरिश रावत पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पंजाबमध्ये राजकीय गोंधळ चालू असताना आता पंजाबमधील नागरिकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणूून पसंती दिली आहे. 21.6 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत केलंय. तर दुसरीकडे सध्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची लोकप्रियता कमी झाल्याचं देखील दिसून येत आहे.

दरम्यान, गोव्यात मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रमोद सावंत यांनी पहिला क्रमांक गोव्याच्या जनतेने दिला आहे. 33.2 टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर आम आदमी पक्षाचा देखील गोव्यात दबदबा असल्याचं पहायला मिळतंय.

थोडक्यात बातम्या-

राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पुण्यात तब्बल 91 गावं कोरोनाची हाॅटस्पाॅट; ‘या’ तीन तालुक्यांना मोठा धोका

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नाट्यगृहे

…तर देवेंद्र फडणवीस खरे शिल्पकार असतील – चंद्रकांत पाटील

ओबीसी आरक्षणाचा विषय निकाली लागणार?; ‘या’ मुद्द्याला राज्यातील सर्व पक्षांचा पाठिंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More