बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी उदाहरण दिलेले ‘ज्युलिओ रिबेरो’ आहेत तरी कोण?

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांंच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण राष्ट्रवादीच्या अंगलट येत असल्याचं दिसताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीचा धडाका लावला. त्यानंतर रविवारी त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी ज्युलिओ रिबेरो याचं उदाहरण दिलं.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यानी ज्युलिओ रिबेरो सारख्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यानंतर ज्युलिओ रिबेरो म्हणजे नक्की कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. ज्युलिओ रिबेरो हे 1953 बॅचचे पोलीस अधिकारी होते. मुंबई पोलीस पासून ते केंद्रीय गृहसचिव पर्यंत काम केलेले ते तडफदार पोलीस अधिकारी होते. अतिशय कडक आणि नाॅन करप्ट अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी 1982 ते 1985 पर्यंत, असं 3 वर्ष काम केलं. त्यांच्या काळात मुंबईत नुकतचं गॅगवाॅर उभं राहत होतं,  या गॅगवाॅरला आळा घालण्यात त्यांना यश देखील आलं होतं. त्यानंतर ते सीआरपीएफचे डिजी देखील होते. तर त्यांनी गुजरातच्या पोलीस महासंचालक पदी काम केलं होतं. 1989 मध्ये त्यांनी पोलीस दलातून निवृत्ती घेतली.

ज्युलिओ रिबेरो यांना पद्मभूषण पुरस्काराने स्नमानित देखील करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहखात्यात विशेष गृहसचिव म्हणून देखील काम केलं आहे. पंजाबमधील असंतोष मोडीत काढण्याचं काम देखील त्यांनी केलं होतं. त्यानंतर 1989 ते 93 पर्यंत त्यांनी रोमानियात भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं होतं.

दरम्यान, रिबेरो यांच्यावर 6 वेळा आत्मघाती हल्ला झाला. त्याचं ‘बुलेट फाॅर बुलेट’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 91 वर्षाचे ज्युलिओ रिबेरो आज देखील पोलीस अधिकाऱ्यांसाठी आणि पोलीस दलासाठी एक आदर्शच आहेत.

थोडक्यात बातम्या-

“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”

“आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात, अन्…”

“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…

‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More