बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे आणि खासदार नारायण राणे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी मराठा क्रांती मुक आंदोलनाच्या मुद्यावरून संभाजीराजे यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यामुळे भाजप खासदार विरूद्ध भाजप खासदार असा वाद रंगला होता. त्यानंतर आता पुन्हा नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर तोफ डागली आहे.

कोण राजे? एक छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर मी दुसऱ्या कुठल्याही राजांना ओळखत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी या राजांच्या मागे धावू नका. मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. शिवाजी महाराज एकटे होते, तरी त्यांनी स्वराज्य स्थापन केले. आपण सुमारे पाच कोटी आहोत, तरीही आपल्याला आरक्षण मिळत नाही. आरक्षण मिळविण्यासाठी कशाला कोणत्या राजाची आणि महाराजाची वाट पाहता?, असं वक्तव्य देखील नारायण राणे यांनी केलं आहे.

असं पुढारी बनत नाही. समाजाला वाटले पाहिजे की हे राजे आहेत आमचे. कार्य करावं आपलं. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. आंदोलन लोकांमध्ये करावं. पेटवायला पण एक धमक लागते. खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागलं, अशी टीका नारायण राणे यांनी यापुर्वी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलाच वाद पेटला होता.

दरम्यान, छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका करण्याइतपत नारायण राणे मोठे नाहीत. छत्रपतींवरील टीका मराठी समाज खपवून घेणार नाही. संभाजी राजे यांनी मराठा आंदोलनाला योग्य दिशा दिली आहे, असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अंकुश कदम यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर, राजीनामा दिला तरी मी भाजपतच राहणार”

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का; निवडणूक पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार

‘महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आरक्षण टिकलं नाही’; दरेकरांचा हल्लाबोल

“मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More