बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबचा नवा ‘कॅप्टन’ कोण? ‘या’ दोन नेत्यांची नावं चर्चेत

चंदीगड | पंजाब काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे मावळते मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं होतं. आपल्यावर पक्षाने अविश्वास दाखवला म्हणत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं अमरिंदर सिंग म्हणाले आहे. त्यानंतर आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसच्या आमदारांची महत्तवाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक वाद समोर आल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचा निर्णय आता हायकमांड घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पंजाबच्या सीएमपदी अंबिका सोनी यांची नियुक्ती करावी, असा निर्णय काँग्रेसच्या अतंरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला होता. मात्र, अंबिका सोनी यांनी ही ऑफर नाकारली आहे. त्यानंतर आता पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड आणि पंजाब काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्यात थेट मुख्यमंत्रीपदाचा थेट सामना रंगणार असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, नवज्योत सिद्धू आणि सुनिल जाखड यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून आमदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा वाद आता दिल्लीत कोणता निर्णय होईल याकडे सर्वांचच लक्ष लागलं.

थोडक्यात बातम्या-

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

निष्काळजीपणा जीवावर बेतला, कोरोना टेस्ट करताना किट घशात अडकल्याने महिलेचा मृत्यू

पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘बहुमत चाचणीला तयार राहा’; अमरिंदर सिंग यांचा थेट हायकमांडला इशारा

“20-22 महिने झाले आमच्या एकाही आमदाराला हात लावू शकले नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More