बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत?; आतापर्यंत केलीय ‘ही’ जबरदस्त कामगिरी

मुंबई | मुंबई पोलिस दलामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. DGP हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईचं पोलिस आयुक्तपद सोपवण्यात आलं आहे. तर परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड विभागात करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाने परमबीर सिंग यांचीही बदली करावी अशी मागणी केली होती. मात्र, हेमंत नगराळे आहेत तरी कोण? त्यांची आत्तापर्यंतची कारकिर्द आपण जाणून घेऊया.

हेमंत नगराळे 1987 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. सहावीपर्यंत चंद्रपूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतरचं शिक्षण नागरपूरच्या पटवर्धन हायस्कुलमध्ये VRCE नागपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर नगराळे यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. नगराळे यांना राष्ट्रपती पोलिस पदक, विशेष सेवा पुरस्कार, आंतरिक सुरक्षा पदक असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

1989 ते 1992 या काळात चंद्रपूरच्या नक्षल भागात नगराळे यांचं पहिलं पोस्टींग होतं. त्यानंतर नगराळे सोलापूरमध्ये DCP या पदावर कार्यरत होते. बाबरी मशिदीच्या पतनानंतर सोलापूर शहरात दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात नगराळे यांचा मोठा वाटा मानला जातो. 1994 ते 1996 या काळात नगराळे रत्नागिरीमध्ये पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळातही त्यांनी ‘एन्राॅन’ प्रकल्पाशी संबंधित जमीन अधिग्रहणाचे अनेक मुद्दे हाताळले होते. 1996 ते 1998 या काळात हेमंत नगराळे यांनी CID विभागात अधिक्षक पदावर देखील काम केलं. त्या काळात MPSC पेपर लिक, अंजनीबाई गावीत ने केलेली लहान मुलाची हत्या ही प्रकरणं त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळली होती.

दरम्यान, हेमंत नगराळे यांनी देशातील सर्वाेच्च यंत्रणा CBI मध्ये देखील काम केलं आहे. तेथीही नगराळे यांनी आपली चमक दाखवत केतन पारेखचा घोटाळा, माधोपुरा कोऑपरेटीव्ह बँक, हर्षद मेहता केसची चौकशी केली होती. 2008 च्या काळात हेमंत नगराळे यांना बढती देऊन MSEDCL विभागात स्पेशल IGP आणि डारेक्टर पदावर नियुक्त करण्यात आले होते. या विभागातही नगराळे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली होती. मुंबईवर झालेल्या 26/11 अतिरेकी हल्ल्यादरम्यान नगराळे MSEDCL मध्ये कार्यरत होते.

थोडक्यात बातम्या – 

‘सचिन वाझे शिवसेनेचे वसुली एजंट’; देवेंद्र फडणवीसांकडून आणखी धक्कादायक आरोप

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 2 हजार पार!

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- नारायण राणे

‘सचिन वाझे शिवसेनेचे वसुली एजंट’; देवेंद्र फडणवीसांकडून आणखी धक्कादायक आरोप

महिला फाटलेल्या जीन्स घालतात हे बरोबर आहे का?; भाजपच्या मुख्यमंत्र्याचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More