राज्यातील सर्वात श्रीमंत, गरीब, तरुण व वयोवृद्ध खासदार कोण; जाणून घ्या एका क्लिकवर

Loksabha Result l राज्यात निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालादरम्यान राज्यात अनेक नवनवीन गोष्टी नागरिकांना अनुभवायला मिळाल्या आहेत. अशातच राज्यातील 48 खासदारांची नावे देखील समोर आली आहेत. पण यामध्ये सर्वात श्रीमंत खासदार कोण आहेत? तसेच सर्वात तरुण खासदार कोण आहेत? यासंदर्भात तुम्हाला माहितेय का? तर आज आपण यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

राज्यातील सर्वात गरीब खासदार कोण? :

अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके हे राज्यातील सर्वात गरीब खासदार आहेत. निवडणूक आयोगानुसार खासदार निलेश लंके यांच्यांकडे 7.8 लाख रुपयांची संपत्ती आहे. निलेश लंके यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे.

सर्वात श्रीमंत खासदार खासदार कोण? :

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची संपत्ती सर्वाधिक आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्बल 223 कोटी रुपये इतकी आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांचा तब्बल 32 हजार मतांनी पराभव केला आहे.

Loksabha Result l सर्वात वयोवृद्ध खासदार कोण? :

राज्यातील सर्वात वयोवृद्ध खासदार काँग्रेसचे आहेत. कोल्हापूरचे 76 वर्षीय खासदार शाहू छत्रपती हे राज्यातील सर्वात वयोवृद्ध खासदार आहेत.

सर्वात तरुण खासदार कोण? :

राज्यातील सर्वात तरुण खासदार काँग्रेसचाच आहे. नंदूरबारचे गोवाल पाडवी हे राज्यातील सर्वात तरुण खासदार असल्याचे दिसत आहे. गोवाल पाडवी यांचं वय अवघे 31 वर्षे इतके आहे. गोवाल पाडवी यांनी भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे.

News Title : Who is the richest, poorest, young and old MP in the state?

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 26 मराठा खासदार, पाहा इतर जातींचे किती खासदार आले निवडून

नाना पटोले भावी मुख्यमंत्री; ‘त्या’ बॅनरमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्रातील नेत्यांची इतर राज्यात कमाल! विनोद तावडेंच्या कष्टाचं झालं चीज

कुठलाच प्रचार केला नाही, तरी तिसरी पास सालगड्याला पडली लाखभर मतं

अरे व्हा! या कारने घातलीये तरुणाईला भुरळ; किंमत व स्पेसिफिकेशन काय?