कोण आहेत शक्तिकांत दास?

कोण आहेत शक्तिकांत दास?

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदावर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास हे भारतीय प्रशासन सेवेचे 1980 च्या तामिळनाडू केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.

शक्तिकांत दास मुळचे आेडीशा राज्यातले आहेत. भारताच्या 15 व्या वित्त आयोगाचे ते सदस्य होते. जी-20 परिषदेत त्यांनी भारतांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तामिळनाडू आणि केंद्रात त्यांनी महत्वाच्या समित्यांवर काम केलं आहे.

केंद्रीय महसूल सचिव पदावर 16 जून 2014 ते 31 ऑगस्ट 2015 या कालावधीत शक्तिकांत दास यांनी काम केलं आहे.

शक्तिकांत दास यांनी माजी आर्थिक व्यवहार खात्याचे  सचिव म्हणून 31 ऑगस्ट 2015 ते 28 मे 2017 या कालावधीत काम पाहिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

Google+ Linkedin