मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प त्याचं स्वागत केलं. यावेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्पही होत्या. दरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या एका महिलेने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या महिलेचं नाव गुरदीप कौर चावला असं आहे. त्या नरेंद्र मोदींच्या अनुवादक (इंटरप्रिटर) म्हणून काम पाहतात. जेव्हा पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांचं हिंदीमधील भाषण त्या इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगतात.
1990 साली गुरदीप यांनी भारतीय संसदेमधून अनुवादक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. मात्र 1996 साली लग्न झाल्यानंतर काही काळाने गुरदीप अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या.
दरम्यान, काल डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासह गुरदीप कौर चांगल्याच चर्चेत राहिल्या.
ट्रेंडिंग बातम्या-
“ना अट, ना कसली झंझट, केवळ एक अंगठा आणि कर्जमाफी”
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची माफी मागत भाजपच्या ‘या’ नेत्याचा राजीनामा
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा- संजय राऊत
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केल्यावर धनंजय मुंडे म्हणाले…
माळेगाव निवडणुकीच्या 7 जागांचा निकाल जाहीर
Comments are closed.