बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुनावालांना कोण धमक्या देतंय?, आव्हाड म्हणाले, “खरंखोटं देशाला कळायला हवं”

मुंबई | नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पूनावाला यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यासंबंधी बोलताना त्यांनी भारतातील धनदांडग्या आणि मोठ्या राजकीय नेत्यांकडून धमक्या येत आहेत आणि दबाव निर्माण होत आहे असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर माझं शिर कापलं जाईल, अशाही धमक्या मिळत असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

सध्या अदर पूनावाला हे लंडनमध्ये असून त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हा खुलासा केल्याने एकच खळबळ माजली आहे. कोरोना लसीचे उत्पादन सध्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. परंतु, राजकीय धमक्यामुळे आणि दबावामुळे ते उत्पादन लंडनमध्ये सुरू करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अदर पूनावाला यांनी केलेला खुलासा हा गंभीर असून त्यातील खरं खोटं तपासण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं. तसेच कोरोना लसीचे उत्पादन करणारे अदर पूनावाला हे अचानक लंडनला का निघून गेले? हे भारतातील प्रत्येक नागरिकाला कळायला हवं, असं आव्हाड यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

अदर पूनावाला यांना शीर कापले जाईल, अशा धमक्या मिळत आहेत. म्हणजे हे प्रकरण गंभीर असून याचा शोध घ्यायला हवा. अशा आशयाचं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात भारतातील नागरिकांना कळायला हवं अशी मागणी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या –

नाद करा पण पोलार्डचा कुठं! अखेरच्या षटकात अशा प्रकारे पोलार्डने साकारला विजय, पाहा व्हिडीओ

वन मॅन आर्मी! एकटा पोलार्ड चेन्नईला पडला भारी, मुंबईचा चेन्नईवर 4 गड्यांनी विजय

‘पैशासाठी आम्ही पगडी घालत नाही’; पंजाबच्या हरप्रीतचा अक्षय कुमारला टोला

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

“बड्या राजकीय हस्तींनी मला…”; लंडनला गेलेल्या अदर पुनावालांचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More