देश

कोरोना विरोधातील लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती- WHO

Loading...

नवी दिल्ली | कोरोना विरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे असं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने इबोला सारख्या रोगावरही लस शोधण्याचा महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता COVID 19 या व्हायरसविरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे, असं WHO ने म्हटलं आहे.

जगभरात कोरोनाचा कहर आहे, जगभरातल्या लाखो लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे याची जाणीव जागतिक आरोग्य संघटनेला आहे. या व्हायरसचा जो परिणाम जगावर आणि इतर आरोग्य सेवांवर तो होतो आहे. त्यावरही जागतिक आरोग्य संघटनेचं लक्ष आहे, असंही घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अफ्रिका, पूर्व युरोप, लॅटिन अमेरिका आणि काही आशियाई देश या ठिकाणी कोरोनाचा जो प्रादुर्भाव होतो आहे त्यावर WHO विशेष लक्ष ठेवून आहे, कारण या सगळ्या देशांमध्ये कोरोना संदर्भातल्या चाचण्याही कमी प्रमाणात झाल्या आहेत, असंही निरीक्षण WHO ने नोंदवलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ५२२ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

चीनबद्दल जगात द्वेष वाढणं ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी- नितीन गडकरी

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या