बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

WHOनं वाढवलं जगाचं टेंशन; ‘कोरोनाची त्सुनामी येणार अन्…’

नवी दिल्ली | कोरोनाच्या (Corona) महामारीनं जगाचं टेंशन वाढवलं आहे. यातच आता ओमिक्राॅनच्या व्हेरियंटनं (Omicron) चिंतेत भर पाडली आहे. त्यामुळे सध्या लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. अशातच आता WHOच्या वक्व्यानं टेंशन आणखीनच वाढलं आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामीे येणार आणि आपल्या मर्यादा ओलांडत काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी निर्बंधांचे सक्तीनं पालन करावे असं वारंवार सांगण्यात येत आहे. सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

Corona: सर्वात पहिल्यांदा लस घेतलेल्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबईनंतर आता ‘या’ ठिकाणीही 31st च्या पार्ट्यांवर बंदी, वाचा काय आहेत नियम

Corona: लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही, आता हातातच…

महात्मा गांधींविरोधात गरळ ओकणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!

“राज्य सरकारमधील नेत्यांना घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट पुरस्कार दिले पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More