धर्मा पाटलांची हेळसांड नक्की कोणत्या सरकारच्या काळात?

मुंबई | धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. धर्मा पाटील यांची हेळसांड कोणत्या सरकारच्या काळात झाली? हा या टीकेमागचा रोख आहे. 

जमिन संपादनासंदर्भात 8 मे 2009 साली प्रस्ताव दाखल करण्यात आला. 13 सप्टेंबर 2011 रोजी संयुक्त मोजणी करण्यात आली. 13 जून 2012 रोजी जमिनीचं स्थळ निरीक्षण झालं. 1 ऑक्टोबर रोजी स्थळ निरीक्षण अहवाल आला. 26 फेब्रुवारी 2014 पासून हरकती आणि सुनावणी सुरु झाली. त्यामुळे हा घटनाक्रम पाहता धर्मा पाटील यांची जमीन संपादित करण्यासंदर्भात सुरुवात जरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाली असली तरी त्यांची फरफट खऱ्या अर्थाने 2014 पासून सुरु झाली.  

‘थोडक्यात’च्या हाती यासंदर्भात 2 कागदपत्रं पडली आहेत. ज्याद्वारे धक्कादायक माहिती समोर आलीय. 

वर दोन पानांचा स्थळ पाहणी अहवाल आहे. या अहवालात संपादित करण्यात येणार असलेल्या क्षेत्रावर 376 आंब्याची झाडं असल्याचा उल्लेख आहे. मात्र 2015 सालच्या पंचनाम्यात आंब्याची झाडं जादुईरित्या गायब आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रिपोर्टवर जमीन मालक आणि पंचांच्या सह्या देखील नाहीयेत.