बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”

मुंबई | परमबीर सिंह यांच्या पत्रावरून सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री आणि जयंत पाटील हे दिल्लीला शरद पवारांच्या भेटीसाठी निघाल्याची चर्चाही सुरू आहे.

या सर्व प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गृह विभाग नेमकं कोण चालवतंय? असा प्रश्न पडला असल्याचं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं. विधान भवनात गृहविभागाशी संबंधित प्रश्न विचारला असता कायम गृहमंत्र्यांऐवजी शिवसेनेचे मंत्री उत्तर देतात. असं फडणवीसांनी सांगितलं.

विधान भवनामध्ये गृहमंत्र्यांना गृहविभागाशी संबंधित प्रश्न विचारला असता शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे उत्तर देताना दिसतात. त्यामुळे गृहविभाग नेमकं कोण चालवतय? असा प्रश्न पडला असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अगोदरच राष्ट्रवादीतून एक आरोप होत होता की, शिवसेनेचे मंत्री कायम ढवळाढवळ करत असतात. आणि त्यातच अनिल परब यांनी गृहविभागाच्या प्रश्‍नाला उत्तर दिल्याने गृहविभाग अनिल परब चालवतात की, अनिल देशमुख चालवतात? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच अशी घटना घडली असली नसून, याआधीही तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीही अशाच प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही शिवाय त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे पोलीस महासंचालक पद सोडून सुबोध जैस्वाल केंद्राच्या सेवेत रुजू झाल्याची माहिती फडणवीसांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”

“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”

“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या निर्मात्यांना सरकारची बाजू घ्यावीच लागते- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More