Top News देश

‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | ब्रिटनमध्ये आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे सर्व देशांनी याचा धसका घेत खबरदरी घेण्यास सुकूवात केली आहे. अशात जागितक आरोग्य संघटनेचे आपतकालीन प्रमुख मायकल रायन यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या संकटाला आपण सामोरे गेलो आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपण हातावर हात ठेवून बसू शकत नाही, असं मायकल रायन यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यानंतर 30 देशांनी ब्रिटीश आणि दक्षिण आफ्रिकेमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आपली सीमा बंद केली आहे. आपण कोरोना रोखू शकतो, असंही मायकल रायन यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाचा नवा विषाणू नियंत्रणाबाहेर असून इतर विषाणूंच्या तुलनेत 70 टक्के जास्त संसर्गाचा धोका असल्याचं ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं होतं. यावर जरी करोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी तो रोखला जाऊ शकतो पण त्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज असल्याचं मायकल म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! लंडनमधून भारतात आलेल्या ‘त्या’ विमानात सापडले कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी

‘तयार रहा… बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात’; तेजस्वी यादवांनी केला गौप्यस्फोट

“मोतीलाल वोरांचं आयुष्य हे जनसेवेचं आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचं आर्दश उदाहरण

देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे- केंद्रीय आरोग्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या