बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येणार, पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे”

नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अशात भारतीयांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आली आहे. भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येण्याची शक्यता आहे, असं जागतिक आरोग्य संगघटनेच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं आहे.

भारतात कोरोनाच्या अनेक लाटा येऊ शकतात. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. कोरोनाच्या लढाईत पुढील 6 ते 18 महिने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. त्या द हिंदू या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण जात आहोत. हा कठिण काळ आहे. आपल्याला पुढील 6 ते 12 महिन्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. हा काळ परीक्षेचा असू शकतो. त्यानंतर संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घ योजना आखावी लागणार आहे, असं सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.

व्हायरसचा विकास कसा होतो, त्यावरही बरच काही अवलंबून आहे. व्हेरिएंटसच्या विरोधात व्हॅक्सिनची क्षमता आणि व्हॅक्सिनमुळे होणारी इम्युनिटी किती काळ लोकांचा बचाव करेल, हे खूप महत्त्वाचे राहणार आहे. यात बरंच काही बदलत आहे, असं सौम्या म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

अमृता फडणवीसांच्या त्या ट्विटला रूपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या….

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”

मला सेक्स करायला जाण्यासाठी ई-पास हवाय; तरुणाच्या अर्जाने पोलीस हैराण

‘शरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला’; शिवसेना आमदाराची टीका

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; वाचा सविस्तर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More