बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यामुळे 2024 साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत मोदींनी खुलासा करावा”

नवी दिल्ली | भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी हे वारंवार मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. भाजपमध्ये असून देखील सुब्रमण्यम स्वामी सतत केंद्र सरकारविरुद्ध बोलताना दिसत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. तर निवडणूकीच्यावेळी देखील त्यांनी भाजपला तोंडावर पाडलं होतं. त्यातच आता त्यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र चढवलं आहे.

नरेंद्र मोदी स्वत: सांगतात, 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये. वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांना त्यांनी बाजूला सारलं आहे. आता 2024 मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल?, याबाबत त्यांनी खुलासा केला पाहीजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहीजे. कार्यकर्त्यांनाच विचारलं नाही, तर वाजपेयींसारखी परिस्थिती होईल, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

चीननं देशात घुसखोरी केल्यानंतर आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं. गलवान, कैलाश रेंजमध्ये आपण करुन दाखवलं. मात्र पुन्हा एकदा चर्चेकडे वळलो. हे चर्चेचं गुऱ्हाळ मला समजत नाही. आपली जमीन आहे, आपल्या छातीवर बसले आहेत. त्यांच्याशी चर्चा काय करायची. आपल्याला त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. चीनसोबत युद्ध करणं गरजेचं आहे. चीन जगासमोर आपल्याला दाबत असल्याचं दाखवत आहे. त्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे, असा शब्दात त्यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

दरम्यान, देशात आणीबाणीसारखी स्थिती नाही. आम्ही मुक्तपणे फिरू शकतो. आम्हाला कुणीही तुरुंगात टाकत नाही. त्यावेळेस आम्हाला कोणताच अधिकार नव्हता. मी भाजपमध्ये आहे, मला कोणती गोष्ट आवडली नाही, तर मी टीका करु शकतो. मात्र काँग्रेसमध्ये आजही कुणी असं करु शकत नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेसवरही केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“फडणवीस म्हणाले होते, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, त्याचं काय झालं?”

नवऱ्याने अन् घरातल्यांनी साथ सोडली, 6 महिन्याच्या मुलासह घराबाहेर पडलेली महिला बनली पोलीस उपनिरीक्षक

“देवेंद्र फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत?”

पुणे विभागात 679 कोटींची थकबाकी; महावितरणकडून वीज बिल वसुलीच्या सूचना

“मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका, चिंगारीचा वणवा पेटण्याआधी जागे व्हा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More