बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबत WHOचा सावधानतेचा इशारा!

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत चालली आहे तोच तिसऱ्या लाटेविषयी तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे लस घेणं हे बंधनकारक आहे. अशातच आता जागतिक आरोग्य संस्थेनं पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे.

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोना विषाणूचा हा व्हेरिएंट बाकी व्हेरिएंटपेक्षा जास्त प्रमाणात पसरत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेनं अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा इशारा दिला आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट हे कोरोना विषाणूचं बदललेलं रूप आहे. हे रुप राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी बोलताना जागतिक आरोग्य संघटना दक्षिण-पूर्व आशियाचे विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी म्हटलं की, कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट लवकरच जगासाठी सर्वात जास्त चिंतेचा विषय बनेल.

दरम्यान, डेल्टा व्हेरिएंट जगातील 100 हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्याचंही खेत्रपाल यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

व्हॉट्सअप चॅटमधून राज कुंद्राच्या ‘या’ धक्कादायक गोष्टी आल्या समोर

मोदींचं मराठीत ट्विट; पांडुरंगाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना

“काहीही न करता पैसे कसे कमवतो?”; राज कुंद्राच्या अटकेनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

“मिटकरी, तोंडाला लकवा झाला होता ना तुमच्या, गावरान गाईचं तूप लावा”

“महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये तातडीने लॉकडाऊन जाहीर करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More