Top News क्राईम पुणे बीड महाराष्ट्र

कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा???

पुणे | पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर फेसबुक, इस्ट्राग्राम, ट्विटर सगळीकडे तिचं नाव चर्चिलं जात आहे. एवढच काय तर टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात देखील तिच्या संबंधित बातम्या आहेत. पूजा चव्हाणने आत्महत्या का केली हे जरी गुलदस्यात असलं तरी पूजा चव्हाण कोण होती? हा प्रश्न सर्वाना पडला असेल….

कोण होती पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण मूळ बीड जिल्ह्यातील परळीची…. सोशल मीडियाची तिला जाम क्रेझ होती. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असायची. भारतात टिकटाॅकने पाऊल टाकलं आणि टिकटाॅक स्टार व्हायला सुरुवात झाली. पूजाही याच काळात टिकटॉक स्टार झाली. टिकटाॅक सोबतच इस्ट्राग्रामवरही तिचं फॅन फाॅलोविन्ग चांगलंच वाढलं. टिकटाॅक बंद झाल्यावर इस्ट्राग्रामवर तीने स्वतःचा वावर वाढवला व तिकडेही काही दिवसात तिची जोरदार क्रेझ दिसू लागली.

प्रसिद्धीस आल्यानंतर तिने स्वतःला राजकीय आणि सामाजिक कार्यात ओढून घेतलं. पूजा बंजारा समाजाची असल्याने समाजाच्या विकासासाठी तिची धडपड सुरु असायची. इथूनच तिची सामाजिक कार्यात वाटचाल चालू झाली. ‘आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे’ अशी तिची इच्छा होता. इंग्रजी आल्यावर समाजात चांगली छाप सोडता येऊ शकते, असं तिला वाटतं होतं.

इंग्रजी शिकायला ती पुण्यात आली होती. पुण्यातल्या वानवडीतील महमंदवाडीच्या हेवन पार्क सोसायटीत चुलत भाऊ आणि त्याच्या मित्रासोबत ती राहू लागली होती. पुण्यात येऊन 2 आठवडे झालं नाही, तो पर्यत तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या का केली? हे जरी गुलदस्यात असलं तरी पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे.

या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव समोर आलं आहे. यात कथित 11 ऑडिओ टेप व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्रं लिहिलं आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. सोबतच कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लॅपटॉप स्कॅन करून पोलिसांनी अधिक माहिती मिळवावी अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री संजय राठोड यांची बाजू समजून घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत”

आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….

‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!

सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर; होणार शिक्षा!

तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या