बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोठया पवारांकडून पत्र चोरत असताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते?”

मुंबई | 2019 मध्ये महाराष्ट्रात 2 महिन्याच्या मोठ्या गोंधळानंतर सत्तांतर झालं. या काळात नेमकं काय राजकारण घडतयं?, कोण कोणाला टाळी देतयं?, कोण कोणाला सत्तेबाहेर ठेवतयं? अशा विविध चर्चांना उधान आलं होतं. आता या राजकीय नाट्याला 2 वर्ष पुर्ण होत आहे. त्यानंतर आता या नाट्यातील एक एक चॅप्टर उघडकीस येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांवर पत्र चोरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून याचा पुढचा पार्ट उघडकीस आला आहे.

‘अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच केले आहे . अजित दादा मोठ्या पवारांच्या  ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’ चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा’, असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

हे प्रकरण एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले आहेत. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला. कोरोना महामारीसारखे भयंकर संकट धुमाकूळ घालत असताना राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी संयम राखणे गरजेचे आहे. नाहीतर जनता त्यांना गांभीर्याने घेण्याचं बंद करेल. उचलली जीभ लावली टाळ्याला असला प्रकार सध्या विरोधी पक्षाने सुरू केला आहे, असा आरोप देखील या अग्रलेखातून केला आहे.

चंद्रकांत पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ आहे. राजकारणात व युद्धात सर्व माफ असते. चढाई करून विजय मिळवायचा असतो. त्यासाठी अनेकदा नैतिक-अनैतिकेच्या पलीकडे जाऊन कार्य सिद्धीस न्यायचे असते. तेव्हा अजित पवार हे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेलेच होते व आमदारांच्या सहीचे पत्र त्यांच्याकडे असणारच. ते चोरले किंवा बनावट पद्धतीने मिळवले असे सांगणे हा राजकीय बालिशपणा आहे. किरकोळ चोऱ्यामाऱ्या करून राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत, असं देखील यात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या

कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तींसाठी नियमात बदल

“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा

केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More