बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल म्हणाले…

नागपूर | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुढील विधानसभा निवडणूकीसाठी स्वबळाचे नारे दिले जात आहेत. त्यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच 2024 मध्ये कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? या मुद्यावरूनही खूप बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावर वक्तव्य केल आहे.

विधानसभा निवडणूकांना अजून खूप वेळ आहे. त्यामुळे त्या अगोदरच युती, आघाडी यावर भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असं म्हणत प्रफ्फुल यांनी स्वबळाची भाषा करण्यांना फटकारलं आहे. आज नागपूरमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल तो मुख्यमंत्री होईल, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप आणि काँग्रेस पक्षाने पुढील निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा नारा दिला होता. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी इतर पक्षांनी स्वबळाचा नारा दिला असेल, तर महाराष्ट्र राज्यात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष उरले आहेत. हे दोन पक्ष एकत्र आले, तर  राज्यात चमत्कार होईल असंही राऊत म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशान स्विकारलंय; मोदींनंतर ठाकरे हाच राष्ट्रीय ब्रँड”

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो- संजय राऊत

“कोरोनाची तिसरी लाट पुढील 6 ते 8 आठवड्यात येण्याची शक्यता”

“बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न शिवसेनेनं पूर्ण केलं; त्यांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जातीये”

“राणे नावाने शिवसेना घाबरते, पुन्हा समोर आल्यास जोरदार उत्तर द्या”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More