बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोडांची विकेट पडल्यानंतर वनमंत्रिपद कुणाला?, ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मुंबई |  संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर वनमंत्री पदाचा कार्यभार कोणाला दिला जाणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदारांचे लॉबिंग सुरू झाले असल्याचं दिसून येत आहे. वनमंत्री होण्याच्या शर्यतीत आता विदर्भ विरुद्ध मुंबई असा जणू सामनाच रंगणार असल्याचं चित्र आहे.

संजय राठोड यांच्यानंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन विदर्भातील एखाद्या आमदाराला राज्यमंत्री पद दिली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील गोपिकिशन बाजोरिया, नितीन देशमुख आणि संजय रायमुळकर या नावांचा विचार मंत्रिपदासाठी केला जाऊ शकतो.

महाराष्ट्रात सध्या राजकिय घडामोडींना वेग येताना दिसून येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर चर्चेत आलेले नाव म्हणजे वनमंत्री संजय राठोड आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या अडचणीत झालेली वाढ या सगळ्या गोष्टींमध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांनी केलेलं शक्तिप्रदर्शन आणि एकंदर परिस्थितीवरून उद्धव ठाकरे त्यांच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांना फक्त 2 मिनिटे भेटण्याची वेळ दिली तेव्हा त्यांची नाराजी उघड झाली होती.

आज संजय राठोड यांनी मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन पुढील राजीनाम्याचा निर्णय घेणार असल्याची चिन्हं असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी भेट घेण्यास नकार दिल्याने संजय राठोड यांच्यावर दबाव अजून वाढला असल्याचं कळतंय. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

संजय राठोडांचं ठरलं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर…

…अन् बायकोने नवऱ्याला टेम्पोला बांधून एक किलोमीटर फरफटत नेलं; पाहा व्हिडिओ

“उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही, वेट अँन्ड वॉच”

“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More