बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CDS जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर CDS पदासाठी ‘या’ मराठमोळ्या नावाची चर्चा

नवी दिल्ली | भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण लष्कराची धूरा जनरल बिपीन रावत सांभाळत होते. बीपीन रावत यांच्या निधनाने सीडीएस (CDS) पदाची जागा आता रिक्त झाली आहे.

सीडीएस हे लष्करातील सर्वोच्च पद असल्याने ते जास्ती काळ रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर सीडीएस पदी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा सध्या सुरू आहे. सीडीएस पदासाठी एक मराठमोळं नाव आघाडीवर आहे.

सध्याचे लष्करप्रमुख एम एम नरवणे (General Naravane) यांची CDS जनरल म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. जनरल बिपीन रावत यांनी सीडीएस म्हणून जी कामं सुरू केली होती त्याची सगळी माहिती जनरल नरवणे यांना आहे शिवाय त्यांचा अनुभव देखील मोठा आहे.

लष्करप्रमुख म्हणून जनरल नरवणे यांचा एप्रिल मध्ये कार्यकाळ संपत आहे. जनरल नरवणे त्यांच्या निवृत्तीनंतर सीडीएस पदी रहाण्याच्या सगळ्या अटी पूर्ण करून ते सीडीएस पदासाठी पात्र ठरतात. तसेच जनरल नरवणे यांच्या इतका अनुभव सध्या कोणाकडे नाही त्यामुळे नवे CDS म्हणून जनरल नरवणे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात ‘हे’ हेलिकॅाप्टर

‘..तरी ठाकरे सरकारच्या अहंकारापुढे झुकणार नाही’; आशिष शेलार आक्रमक

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदार आशिष शेलारांना झटका; ‘तो’ वाद पेटण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More