बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आसामच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; भाजपमध्ये संभ्रम

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. निवडणूक जिंकल्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री सर्बनंदा सोनोवाल यांना परत एकदा मुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात येणार नसल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री सर्बनंदा सोनोवाल यांच्याऐवजी हिमंता बिस्वा सर्मा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशा चर्चा सुरू झाल्या. परंतु जर सोनोवाल यांचं पद काढून ते हिमंता बिस्वा सर्मा यांना दिलं गेलं, तर यामध्ये भाजपला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या सर्व प्रकरणात सध्या संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र भाजपच्या गोटात पाहायला मिळत आहे.

आसाममध्ये विधानसभा निवडणूक सुरू असताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नेमका कोण असणार याबद्दल कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती. तसेच हिमंता बिस्वा सर्मा यांच्या गटातील दबावामुळे असे प्रश्न भाजपने अनुत्तरीतच ठेवले. 2016 च्या निवडणुकांपेक्षा भाजपला आसाममध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तसेच सर्बनंदा सोनोवाल हे भाजपचे ईशान्य भारताचे मोठे आणि लोकप्रिय नेते आहेत तर भाजपचे स्टार प्रचारक हिमंता बिस्वा सर्मा हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत.

आसाम विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार? कोणाचं पारडं जड होणार? याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागून आहे. दरम्यान, भाजपने मात्र अद्याप यावर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलं नसून याबाबतीत संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ; निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात

मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं सरकारनं बंद करावं – चंद्रकांत पाटील

चिंता वाढली! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ

आमदार असावा तर असा; अन्… ‘या’ आमदाराचा चक्क कोविड सेंटरमध्येच मुक्काम

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More