बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? ‘या’ तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

मुंबई | भारतीय वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची (Rohit Sharma New ODI Captian) नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये आणि सर्वकालिन महान खेळाडूंमध्ये समावेश होणाऱ्या विराटला (Virat Kohli) बीसीसीआयनं (BCCI) डच्चू दिल्यानंतर रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी लागली आहे. अशातच आता रोहित शर्माचा उपकर्णधार पदाचा उत्तराधिकारी कोण?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

रोहित शर्मा टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा उपकर्णधार राहिला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसत होता. अशातच आता भारतीय संघाच्या उपकर्णधार पदासाठी आता तीन भारतीय खेळाडूंची नावं चर्चेत आहे.

भारतीय सलामीवीर के एल राहुल यांचं नाव उपकर्णधार पदासाठी घेतलं जातंय. राहुल गेल्या काही दिवसांपासून सामन्यांमध्ये सातत्य दाखवत आलाय. त्याबरोबर आयपीएलमध्ये त्याने पंजाब किंग्जचं नेतृत्व देखईल केलं आहे. त्याचबरोबर रिषभ पंतचं नाव देखील आता उपकर्णधार पदासाठी घेतलं जातंय.

दरम्यान, रिषभ पंतबरोबरच आता भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचं देखील नाव समोर येत आहे. गेल्या अनेक कालावधीपासून उपकर्णधारपदी भारतीय गोलंदाजांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आता मोहम्मद शमीचं नाव देखील घेतलं जातंय. बीसीसीआय लवकरच उपकर्णधार पदासाठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांतदादा, अडवाणींना विचारून घ्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं बोट…”

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

पोलिसांची मुजोरी! कडेवर चिमुकला तरीही बापाला पळू-पळू मारलं; पाहा व्हिडीओ

बंपर ऑफर! iPhone 12 Pro वर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

चिंताजनक! पुणे-मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; ‘ही’ गोष्ट ठरतेय कारणीभूत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More