बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोलापूर महानगरपालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढणार?

सोलापूर | नुकत्याच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या पडल्या. अशातच आता सोलापूर महानगरपलिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत.

आज सोलापूर दौऱ्यात शरद पवार हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायचा याबाबतचा निर्णय घेणार आहे. सोलापूरातील उद्ध्वस्त झालेला बालेकिल्ला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सध्या सोलापूरकरांचं लक्ष शरद पवारांच्या दौऱ्याकडे लागलं आहे.

कोणत्या कोणत्या वॉर्डात राष्ट्रवादी कमकुवत आहे याचा आढावा घेऊन पवार पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही देणार आहेत. तसेच महेश कोठे आज पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेस, शिवसेना करत राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविली जाणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार हे 2 सप्टेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर जाणार होतेे. मात्र तो दौरा अचानकपणे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर महिन्याभरानंतर ते दौऱ्यावर आले  आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक खलबतं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मास्क न वापरणाऱ्यांनो सावधान; आता भरावा लागणार एवढ्या रुपयांचा दंड!

‘या’ कारणामुळे तेजस्विनी पंडितने मागितली चाहत्यांची माफी, म्हणाली…

‘या’ कारणामुळे नोटेवरून गांधीजींची प्रतिमा हटवावी, काँग्रेस आमदाराची पंतप्रधानांकडे मागणी

अन् चक्क अजित पवार थेट धरणाच्या मधोमध अडकले, त्यानंतर म्हणाले…

“पाहुणे घरात आहेत, ते गेले की मग…”; अजित पवारांचा आपल्या खास शैलीत टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More