Maharashtra l विधानसभा निवडणुकीत नेतेमंडळी जोरदार प्रचार करत आहेत. अशातच आता उमेदवार कार्यकर्त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते जोरदार प्रचार आहेत. मात्र आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखे अभियान सुरु झाले आहे.
‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ :
गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान मुक्ती पथमार्फत अभियान सुरु केले आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी या मुक्ती पथ ही संस्था सुरु केली आहे. या संस्थेने राज्यातील महिलांना आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी बॅनर देखील लावले आहेत.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यात ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असे अभियान सुरु केले आहे. मात्र आता त्याचे बॅनर देखील अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
Maharashtra l तीन विधानसभा मतदारसंघात हे अभियान सुरु :
याशिवाय या विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार दारू पाजेल किंवा दारू वाटप करेल त्या उमेदवाराला नक्कीच पाडा असे आवाहन देखील डॉक्टर अभय बंग यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागासह सर्वत्र दारु बंदीसाठी जनजागृती आणि समुपदेशनचे काम ही संस्था करत आहे.
एकूण गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये गडचिरोली, आरमोरी, अहेरी या मतदार संघांचा समावेश होत आहे. मात्र आता मुक्तीपथ मार्फत अनेक बॅनर लावलेले दिसत आहेत.
News Title : Whoever gives alcohol to my husband, I will definitely defeat that candidate
महत्वाच्या बातम्या –
कराळे मास्तरांनी मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला! नेमकं काय म्हणाले
…म्हणून अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात; कधीच खरेदी करणार नाहीत स्वतःच घर
महायुती की पुन्हा महाविकास आघाडी, राज्यात कोण मारणार बाजी?; सर्व्हेतून मोठी माहिती समोर
मनसेतून वंचित मग ठाकरे गटात गेले, आता वसंत मोरे थेट तुतारी फुंकणार?
“जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणार”; संभाजी निलंगेकरांची घोषणा