बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यांबाबत WHO चा मोठा आणि धक्कादायक खुलासा!

नवी दिल्ली | 2020 मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी 30 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे, असा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे.

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत कमी दाखवली जात आहे. जगभरात मृत्यूची वास्तविक संख्या ही दाखवल्या गेलेल्या आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे, असं डब्ल्यूएचओच्या सहाय्यक महासंचालक समीरा अस्मा यांनी म्हटलं आहे.

आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार WHO नं म्हटलं की 2020 मध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोरोनामुळे कमीत कमी 30 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. देशांनी सांगितलेल्या अधिकृत संख्येपेक्षा हा आकडा तब्बल 12 लाखानं जास्त आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की संघटनेला मृतांची सध्याची संख्या 33 लाख सांगितली गेली आहे. मात्र, 2020 च्या अंदाजानुसार पाहिला गेल्यास मृतांचा आकडा अत्यंत कमी दाखवला जात आहे.

दरम्यान, देशात सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचं प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. दुसऱ्या लाटेतून अजून आपण सावरलो नसताना आता तिसऱ्या लाटेमुळं लहान मुलांना अडचणी निर्माण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नाही, त्यामुळे…- राजेश टोपे

राज्यपाल आमदार नियुक्तीचं शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून बसू शकत नाही- उच्च न्यायालय

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी महत्वाच्या; एम्सच्या संचालकांचा महत्वाचा सल्ला

नव्या नवरीने लावली नवऱ्याच्या कानशिलात त्यानंतर झालं असं काही की…; पाहा व्हिडीओ

पोराचा वाढदिवस बापासाठी ठरला अखेरचा दिवस; तलावात गेले पोहायला अन्…, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More