बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

WHOच्या दाव्याने खळबळ, कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटने चिंता वाढली

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ठाकरे सरकारने (Thackeray Goverment) कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला.

देशात कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा XE हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron) BA.2 व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे.

XE व्हेरिएंट हा ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 प्रकाराचा रिकॉम्बिनंट स्ट्रेन आहे. तर समोर आलेल्या अहवालानूसार XE व्हेरिएंटच्या प्रसाराचा दर हा BA.2 च्या तुलनेत 10 टक्क्यांहून अधिक असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, जोपर्यंत XE व्हेरिएंटच्या प्रसाराची क्षमता आणि लक्षणांमध्ये काही बदल दिसत नाही तोपर्यंत तो ओमिक्रॉनचाच प्रकार मानला जाईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर याची पूर्ण खात्री करण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…’; चंद्रकांत पाटलांकडून जाहीर कौतुक

“शिवतीर्थावरचा कालचा भोंगा भाजपचा आणि स्क्रिप्टही त्यांचीच”

युक्रेनमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर; विकृत अवस्थेत सापडले ‘इतके’ मृतदेह

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं; वाचा ताजे दर

“…म्हणून मी राज ठाकरेंना अधिक गांभीर्याने घेत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More