मुंबई | गेल्या दोन वर्षापासून कोरोना महासाथीच्या रोगानं हाहाकार माजवला असून भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना विषाणू आणि त्याच्या नवनवीन व्हेरियंटनं तर कहरच केला आहे. सध्या कोरोना विषाणूचा ओमिक्राॅन व्हेरियंट हातपाय पसरवत चालला आहे.
ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि झपाट्यानं वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता प्रशासनानंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अशातच आता तज्ज्ञांनी कोरोनाच्या पुढच्या व्हेरियंटविषयी महत्त्वाची माहिती सांगितली आहे.
कोरोना विषाणूचा पुढचा व्हेरियंट ओमिक्राॅनपेक्षाही अधिक संसर्गजन्य असू शकतो. असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा पुढचा व्हेरियंट सौम्य असेल, अशी अपेक्षा आपण निश्चितपणे करू शकतो. पण प्रत्यक्षात तसे होईलच याची शाश्वती नाही. म्हणूनच लोकांनी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, कोरोना आणि कोरोनाच्या व्हेरियंटनं सगळ्यांनाच हैराण करुन टाकलं आहे. यातच तज्ज्ञांकडून नवनवीन सल्ले आणि इशारे दिले जात आहेत. त्यामुळे अधिक चिंतेचं वातावरण पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंबासह ‘भीक मांगो’ आंदोलन, ‘या’ ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नावाने मागतायेत भीक
Republic Day 2022: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बाहेर, ध्वजारोहन सोहळ्याला लावली हजेरी
Republic Day 2022: जीवघेण्या थंडीतही जवानांनी ‘इतक्या’ फूट उंचीवर फडकवला झेंडा
येत्या 2 ते 3 दिवसांत ‘या’ भागात कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा इशारा
अमोल कोल्हेंविरोधात 26 जानेवारीला नारायणगावातील घराबाहेर सविनय आंदोलन
Comments are closed.