धनुष्यबाण कुणाचं?, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर
मुंबई | राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकार (Thackeray Goverment) कोसळलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं.
मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला.
एकनाथ शिंदेंच्या गटानं निवडणूक आयोगासमोर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असून त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला जात आहे.
17 जानेवारी रोजी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आपला युक्तीवाद केल्यानंतर सुनावणी 20 जानेवारी रोजी पुढे ढकलण्यात आली होती. आज 20 जानेवारी रोजी ही सुनावणी पुन्हा एकदा सुरु होईल.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.